चीत्रावलोकन
30 October 2017
11 April 2017
4 March 2017

महाराष्ट्र वैश्य संघ नागपुर तर्फे दि. ८ व ९ एप्रील २०१७ रोजी समाजभवन ऊद्घाटन निंमीत्त समाजबांधवांच्या संपर्क यादीसह स्मरणिकेचे प्रकाशन प्रस्तावित आहे त्याकरीता आपन आपली स्वतःची, परीवारातील सदस्यांची व आपनास ज्ञात ईतर समाजबांधवांची माहीती (नाव, पत्ता, फोन नं.) पाठवावी. तसेच ईतर साहीत्य, लेख, कविता, चित्र व सशुल्क जाहीरात देखिल आमंत्रीत आहे.
सदर माहीती तुम्ही म. वै. संघ संचालक मंडळास किंवा प्रतिनीधींना १९ मार्च २०१७ पुर्वी द्यावी.
अथवा mvsnagpur1@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावी.
प्रतिनीधींची यादी खालीलप्रमाणे आहे
१, मंगेश वड्याळकर -(नागपूर विभाग) 9326004095
२, सदानंद शेटे-(वर्धा विभागातील) 9890921456
३, विद्याधर भुताड-(अमरावती जिल्हा) 9423686263
४, रमेशराव सावरकर -(पुणे जिल्हा) 9890883767
५, अजय वाऊ -(भोपाळ, इंदोर) 9420856499
६, अभय वड्याळकर -(अकोला, खामगाव) 9422112950
७, अनिल वलोकार (जळगाव, नंदुरबार, धुळे, अमळनेर, गुजरात) 9823054801
८, दत्तात्रय वझरकर -(जबलपुर, बर्हानपुर, रावेर) 9822233499
9, प्रतीक पुरकर- (मुंबई, नाशिक) 8600430005

।।धन्यवाद ।।
स्मरणिका प्रकाशन समिती,
म. वै. संघ, नागपूर.

महाराष्ट्र वैश्य संघ नागपूर तर्फे आयोजित समाजभवन उद्घाटन कार्यक्रम अंतर्गत दि. ०८/०४/२०१७ शनिवार रोजी समाज भवन रेशीमबाग नागपूर येथे आयोजित वधु वर मेळावा साठी भरावयाचे पत्रक नोंदणी शुल्क रु. १५० फक्त
सूचना: म. वै. संघ. नागपूर संचालक मंडळ अथवा अधिकृत सादस्यांकडे वर्गनिसह हे पत्रक जमा करावे.
27 September 2016
12:22
Vaishya Sonar
No comments
वैश्य सोनार समाजाचा इतिहास व आपल्या परिवाराचे मागील चार ते पाच पिढीचे दाखले व लिखित पुरावे मिळण्याची सोय व्हावी म्हणून आपल्या समाजातील काही थोर व आदरणीय व्यक्तीं व त्याचे सहकारी यांनी त्याकाळी मेहनत व परिश्रम करून संपूर्ण समाजाची नामसूची प्रकाशित केलेल्या आहेत आपल्या माहिती साठी देत आहोत.
१२ एप्रिल १९२३ रोजी प्रकाशित संपुर्ण वैश्य सोनार समाजाची पहिली नामसूची. त्याकाळी आपल्या वैश्य सोनार समाजास "वैश्य ज्ञाती ( व्यवसाय सोनारकी )" असे संबोधित.
२१ फेब्रुवारी १९७८ रोजी प्रकाशित संपुर्ण वैश्य सोनार समाजाची दुसरी नामसूची.
प्रकाशक:
कै. श्री. भास्करराव गणपतराव वलोंकार, नागपूर
१२ एप्रिल १९२३ रोजी प्रकाशित संपुर्ण वैश्य सोनार समाजाची पहिली नामसूची. त्याकाळी आपल्या वैश्य सोनार समाजास "वैश्य ज्ञाती ( व्यवसाय सोनारकी )" असे संबोधित.
प्रकाशक:
कै. श्री. वासुदेव गणेश शिंगणापूरकर, नागपूर
२१ फेब्रुवारी १९७८ रोजी प्रकाशित संपुर्ण वैश्य सोनार समाजाची दुसरी नामसूची.
प्रकाशक:
कै. श्री. भास्करराव गणपतराव वलोंकार, नागपूर
२८ फेब्रुवारी १९८८ रोजी प्रकाशित संपुर्ण वैश्य सोनार समाजाची तिसरी नामसूची.
प्रकाशक:
डॉ . श्री. मधुकर भगवंतराव दाभाडे
अध्यक्ष, म . वै . संघ , नागपूर
प्रकाशक:
डॉ . श्री. मधुकर भगवंतराव दाभाडे
अध्यक्ष, म . वै . संघ , नागपूर
25 August 2016
10:33
Vaishya Sonar
No comments
भारतातील सोनारकाम : भारतात सोने ही धातू अत्यंत प्राचीन काळापासून ज्ञात असून वापरात आहे. तिला सुवर्ण वा हिरण्य असा शब्द योजलेला आढळतो.ऋग्वेद, अथर्ववेद, रामायण, महाभारत आदी ग्रंथांत सोन्याचे व सोनारकामाच्या कौशल्याबाबत वारंवार उल्लेख आलेले आढळतात. त्यांतील सुवर्णालंकार किंवा वास्तुशिल्पात सोन्याचा झालेला वापर यांतील वर्णनांवरून तत्कालीन सोनारकाम कारागिरांचे कौशल्य व निपुणता लक्षात येते.
कौटिल्याच्या मते सोनारकामाचे क्षेपण, गुण व क्षुद्रक हे तीन प्रकार आहेत. हिरे-माणकांच्या जडावाच्या कामाला ‘क्षेपण’, सोन्याची तार ओढून केलेल्या कामाला ‘गुण’, तर भरीव किंवा पोकळ दागिने तयार करण्याला ‘क्षुद्रक’ असे म्हणतात. मढविणे व मुलामा देणे हे देखील सोनारकामाचे प्रकार होत. सोनारकाम करणाऱ्यांचा उल्लेख ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद इ. ठिकाणी आहे. नंतरच्या काळात सुवर्णकार व सुवर्णकर्तार असा देखील उल्लेख आढळतो. सोन्याच्या परीक्षेत हे लोक अत्यंत निपुण व तरबेज असल्याने पाणिनीने त्यांना आकर्षिक हे विशेषण लावलेले आहे. रामायणात उल्लेखिलेले पुष्पक विमान हे सोनारकाम कारागिरीचे उत्तम उदाहरण आहे.
भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अशी समजूत प्रचलित आहे की, विशिष्ट प्रक्रियेद्वारे सामान्य धातूंपासून (विशेषतः तांबे) सोने तयार करता येते. रसशास्त्रात वर्णन केलेली हेमवती ही सोने बनविण्याची विद्या आढळते. रसरत्नाकर या ग्रंथात प्रसिद्ध रसशास्त्रज्ञ नागार्जुन याने तांबे व चांदी या धातूंपासून सोने बनविण्याचे प्रयोग दिलेले आढळतात. अलंकार व आभूषणांसाठी सोन्याचा वापर प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे अलंकार लहान मुले, स्त्री-पुरुष तसेच पशूंसाठीही बनविले जात. बाहुभूषणे, उरोभूषणे, कुंडले, रत्नमाला, वळी, अंगठी, कंठा आदी प्रकारचे दागिने बनविण्यात तत्कालीन सोनारकाम कारागीर निष्णात होते. पाणिनीच्या अष्टाध्यायीत कर्णिका, ललातिका, अंगुलिका आदी अलंकारांचे उल्लेख आहेत. भारतातील सांची, मथुरा, भारहूत, अमरावती आदी स्तूपांतील मूर्तिशिल्पांतून आणि अजिंठा, भाजे आदी लेण्यांतील भित्तिचित्रे यांतून विविध अलंकाराचे नमुने आढळतात.
वेदकालीन सोनार स्त्रियांसाठी कुरीरम्, ओपश (केसांत माळली जाणारी आभूषणे) ; निष्कंठ्य, निष्कग्रीव (गळ्यात घातले जाणारे) तसेच हिरण्यकंठी, सुवर्णशतकंठी यांसारखे दागिने घडवीत असत. घोड्यांना सालंकृत भेट देण्याची पद्धती प्राचीन काळी होती. हत्तीच्या सुळ्यांना सोन्याने सजविले जात असे. विविध विधींसाठी सोन्याचे जानवे, गाय, पाळणा, निरांजन इ. वस्तू घडविल्या जात. स्फ्य, कुर्च इ. यज्ञात लागणारी भांडी, भोजपात्रे, विविध भांडी इ. अनेक वस्तू मुबलक प्रमाणात सोन्याच्या बनविलेल्या असत. सोनारकाम करणाऱ्यांना मूर्तिकलाही ज्ञात असे. रामायणात सुवर्णमूर्त्यांचा वारंवार उल्लेख आढळतो. विनिमयाचे साधन म्हणून सोन्याची नाणी पाडली जात. ऋग्वेदात मना, निष्क इ. नाण्यांचा उल्लेख आढळतो, तसेच ‘शतमान’ नावाचेही नाणे होते.
भारतात धातूंचे हस्तकलाकाम हा फार प्राचीन व्यवसाय असल्यामुळे त्याची प्रचिती सिंधू संस्कृतीतील (इ. स. पू. २७५०-१७५०) मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेले चांदीचे फुलपात्र आणि चकचकीत सुवर्ण रत्ने यांतून येते. प्राचीन काळी सोन्याच्या मुबलकतेमुळे निरनिराळ्या वस्तू सोन्यापासून बनविल्या जात, तसेच वास्तुनिर्मितीतही सोन्याचा मुक्तपणे वापर केला जात असे. अथर्ववेदात सोन्याच्या नौकेचा व वल्ह्यांचा उल्लेख आहे. सैन्यासाठी लागणारे रथ, वाद्ये, चिलखते, शिरस्त्राणे सोन्याची बनविलेली असत. इ. स. पू. पहिल्या शतकातील सुत्तुकेनी येथील थडग्यात सुवर्ण कमळे-कलिका आणि वर्तुळाकार जाडजूड कर्णभूषणे मिळाली; तर बिमरान (अफगाणिस्तान) येथील अवशेषांत सोन्याच्या मण्यांनी-माणकांनी सुशोभित केलेली मंजूषा आढळली. गंधार (अफगाणिस्तान) कलेतील दागिन्यांवर ग्रीकांश संस्कृतीचा प्रभाव आढळतो. मध्ययुगातील मंदिर शिल्पांतून विशेषतः खजुराहो, कोणार्क, हळेबीड, सोमनाथ येथील मंदिरांतून विविध प्रकारच्या दागिन्यांची रेलचेल आढळते. कर्नाटकातील मंदिर शिल्पांतून दागिन्यांची विशेष रेलचेल असून कारागिरीमधील कौशल्य आढळते. मुसलमानांच्या भारतातील आगमनानंतर पुनरुत्थान प्रक्रियेला सुरुवात होऊन कोफ्तगारी कलेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. ती इराण-काबूलमधून (अफगाणिस्तानातून) भारतात प्रविष्ट झाली. सोन्याच्या पत्र्यांचा पृष्ठभाग खोदून जडावाचे काम तलवारींच्या मुठी, ढाली, बिचव्याची मूठ यांच्या अलंकरणासाठी करण्यात येऊ लागले. मोगल काळात (१५२६-१७०७) चिलखतींच्या अलंकरणात सोन्याचा सर्रास उपयोग उच्चभ्रूत प्रचलित झाला. मुस्लिम कारागिरांनी कुराणातील वचने, काव्यपंक्ती किंवा शुभेच्छा दर्शक वाक्ये उठविण्यात आपले कौशल्य प्रकट केले (भारत इतिहास संशोधक मंडळातील कुराणाची प्रत). मोगलांनी भारतभर जवाहिरांना व सुवर्णकारांना आश्रय देऊन उत्तेजन दिले; पण त्यांतील सर्वोत्तम कारागीर आग्रा आणि दिल्ली येथे होते. कोहिनूर हिरा बसविलेले रत्नजडित सोन्याचे मयूर सिंहासन हे भारताच्या वैभवाचे द्योतक होते. उत्तर भारतात मीनाकारी कला अधिक लोकप्रिय होती. प्रदेशपरत्वे स्थानिक केंद्रातून पर्यायी भिन्न तंत्रे विकसित झाली. काश्मीरमध्ये ‘सुराही’ नामक सोन्यावर प्रक्रिया करण्याची एक विशिष्ट पद्धती प्रचलित होती. या पद्धतीत फुलांसारखा रचनाबंध सोन्याच्या ठिपक्यांच्या चांदीच्या (ठोकलेल्या) पत्र्यांवर रेखाटण्यात येई. गुजरात, सियालकोट, जयपूर, अलवार व सिरोही या ठिकाणी कोफ्तगारी कला अद्यापि प्रसिद्ध आहे. येथील कारागीर लोखंड व पोलाद या मूळ धातूंवर सोन्याच्या तारांनी अत्यंत कुशलतेने विविध आकृतिबंध उठवून वस्तू अलंकृत करतात. अशा प्रकारच्या वस्तूंमध्ये सुरई, मंजूषा, तबके, थाळ्या, चाकू, अडकित्त्ये, कातऱ्यां, फुलदाण्या, हुक्क्याच्या बैठकी आणि तत्सम शोभादायक वस्तूंचे अलंकरण करण्यासाठी कोफ्तगारीचा कलात्मक उपयोग या ठिकाणी केला जातो. त्रावणकोरमध्ये केस बांधावयाच्या सुवर्ण पिनांत फुलांच्या आकृतिबंधांचा उपयोग केलेला आढळतो. तसेच अन्य नीतिवचने आणि सांस्कृतिक चिन्हे उठविण्याचे कसब कलाकारांनी दाखविले आहे. लखनौ, जयपूर, त्रिचनापल्ली, तिरुपती आणि बंगलोर या शहरांतून आजही सुवर्ण कलाकाम मोठ्या प्रमाणावर होते.
मराठा अंमलात सोन्याचे सिंहासन बनविण्याची परंपरा शिवकाळापर्यंत अस्तित्वात असलेली आढळते. छ. शिवाजी महाराजांचे सुवर्णांकित सिंहासन रामजी प्रभू चित्रे यांनी बनविले होते आणि त्यावरील कलाकुसरयुक्त सुवर्णांकित छत्र या कलेची साक्ष देते; मात्र शिवकाळात अलंकार वा दागिने फार मर्यादित होते; परंतु पेशवेकाळात (१७२०-१८१८) कर्नाटक, गुजरात, माळवा, बुंदेलखंड, दिल्ली, आग्रा, बंगाल आदी प्रदेशांतील मराठ्यांच्या संचारात तेथील अलंकारांची ओळख झाली. कलगी तुरा, शिरपेच ही शिरोभूषणे, भिकबाळी, चौकडा, कर्णफुले, नथ आणि कंठी, गोफ, रत्नहार, चंद्रहार, मोहनमाळ, तन्मणी, चपलहार ही कंठभूषणे व अन्य दागिने आणि देवदेवतांच्या मूर्ती सोन्याचांदीच्या, हिऱ्यामाणकांच्या बनविण्यात येऊ लागल्या. कर्नाटकातील श्रीरंगपट्टणमच्या टिपू सुलतानाचे सिंहासनही सोन्याचे असून त्याच्याकडील फर्निचरवर सुवर्णांकित कलाकुसर आढळते.
विविध गोष्टींना मुलामा देण्याच्या कामासाठीही सोन्याचा वापर प्राचीन काळी होत असे. सोनारकामाचा विणकामाशीही संबंध आहे. अनेक भरजरी वस्त्रे सोन्याचा उपयोग करून विणलेली असत.
सोन्याचा अपहार करणे ही सोनारकाम करणाऱ्यांची एक प्राचीन काळापासून चालत आलेली मनोवृत्ती आहे. खोटे वजन देणे, दागिन्यातील सोने काढून त्यात हीन धातू मिसळणे, जुने दागिने वितळविताना त्यांतील सोने काढणे, सोन्याच्या पत्र्यांच्या आत शिशाचा वा तांब्याचा पत्रा घालणे इ. प्रकार कौटिल्याने सांगितले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी त्याने दंडही सांगितला आहे, तसेच सोनारांना कोणत्या जागी बसवावे याचेही नियम त्याने ठरवून दिले आहेत.
मराठी विश्वकोश (महाराष्ट्र शासन) वरून साभार

13 August 2016
11:48
Vaishya Sonar
No comments
आपल्या वैश्य सोनार समाजातील युवा तरुण व तरुणींच्या सांघिक प्रयत्नातून समोर आलेले संकेतस्थळ website आपलेसमोर सदर कारतानी आनंद होतोय. कृपया आपणही भेट द्यावी
http://www.mvss.co.in/
हे संकेतस्थळ सर्वसमावेशक स्वरूपातील असून मुख्य संकेतस्थळ साठी कार्य प्रगतीपथावर आहे. आमचा यामागील उद्देश समाजहितासाठी झटणाऱ्या संस्थांचे सबलीकरण व समाजातील सर्व घटकांना माहितीचे आदानप्रदान व जतन करून ठेवणे हा होय जेणेकरून पुढील पिढीस त्याचा योग्य फायदा व्हावा.
संकेतस्थळाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे

१. मुख्यपान:
* समाजातील घडामोडी, वार्ता news for past events & proposed events.
slideshow चित्रफित
* page link tabs, पृष्ठ कळ
* Directory form नामसूची फॉर्म,
* Matrimony Registration. वधु वर माहिती फॉर्म,
* Community Store Registration समाज भांडार सूची फॉर्म.
* सामाजिक संस्थांची यादी
* Total Page views संकेतस्थळ दर्शक संख्या.
* facebook page फेसबुक पान
* location map स्थानदर्शक नकाशा
* calander दिनदर्शिका
* advertisement जाहिरात
* voting मतचाचणी
http://www.mvss.co.in/p/about-us.html
२. about us. आमचे बद्दल
* आमचेध्येय Our Aim,
* उद्देश्य Our objectives ,
* मुख्य कार्यरत चमू Our Core Team,
* इतर स्वयंसेवक Our Team Members.
http://www.mvss.co.in/p/societies.html
३. सामाजिक संस्था
समाजहितासाठी झटणाऱ्या विविध संस्था त्यांची माहीती व कार्याचा प्रचार व प्रसार साठी प्रत्येक संस्थेचे समर्पीत पान आहेच ज्यावर त्यांचे कार्य, ऊपक्रमाची कायम नोंद करता येते
त्यासह समाज जोडो अभीयानाचे महत्व जाणुन त्याकरीताही समर्पीत पानाची तजविज केली आहे.
http://www.mvss.co.in/p/matrimonial.html
४. महावैश्यसंगम वधु वर संशोधन Mahavaishyasangam Matrimony
विवाहोत्सुक युवक व युवतींची छायाचित्रे, कोड नं. व थोडक्यात ओळख, सुरेक्षेसाठी अधिक माहिती प्रसिद्ध केल्या जाणार नाही ती वैयक्तिकरित्या दिली जाईल त्याकरिता सभासद व्हावे लागेल जी कि निशुल्क सेवा राहील.
http://www.mvss.co.in/p/blog-page.html
५. सदस्य नोंदणि
समाजबांधवांची व परिवारातील सदस्यांची नोंदणी व त्याकारीया कायमस्वरूपी form ज्याद्वारे माहिती जन्म, मृत्यू, व विवाह या कारणांसाठी अद्ययावत करता येईल.
http://www.mvss.co.in/p/business.html
६. संपर्क यादी व नामनिर्देशिका
झालेल्या सदस्यांची व सामाजबांधवांची नोंदणी येथे कायमस्वरूपी साठविल्या जाईल व फक्त नोंदणीकृत सदस्यांनाच पाहता येईल.
http://www.mvss.co.in/p/ladies-club.html
७. सामाजिक भांडार community store
हि व्यावसाईक माहिती पुस्तिका आहे ज्याद्वारे समाजातील व्यावसाईक व उपभोक्ता यांना एक व्यासपीठ प्रदान केल्या गेले आहे जेणेकरून समाजातील अर्थकारण हे समजताच राहील.
http://www.mvss.co.in/p/e-masik.html
८. ई पत्रिका
हे सदर वाचन प्रेमींसाठी आहे व समाजाबद्दल, सरकारी गैर सरकारी माहिती शासकीय आदेश येथे उपलब्ध करून देण्यात येतील.
http://www.mvss.co.in/p/social-media.html
९. सोशल मिडीया
वेबसाईट संबंधित सर्व सोशल मिडिया वरील माहिती
याउपर प्रत्येक संस्थेस स्वतंत्र पान
१०. महाराष्ट्र वैश्य संघ, नागपूर
http://www.mvss.co.in/p/mvs-nagpur.html
११. महाराष्ट्र वैश्य सोनार संघ, अमरावती
http://www.mvss.co.in/p/mvs-amravati.html
१२. मुंबई विभागीय वैश्य सोनार संघ, मुंबई
http://www.mvss.co.in/p/mvs-mumbai.html
१३. वैश्य नवयुवक मंडळ, अमळनेर
http://www.mvss.co.in/p/mvs-amalner.html
१४. सोनार समाज, खामगाव
http://www.mvss.co.in/p/mvs.html
१५. सोनार समाज ट्रस्ट, बऱ्हाणपूर
http://www.mvss.co.in/p/mvs-burhanpur.html
१६. वैश्य सोनार संघ, अकोला
http://www.mvss.co.in/p/vaishya-sonar-samaj-sangh-akola.html
१७. अखिल वैश्य सोनार संघ, पुणे
http://www.mvss.co.in/p/mvs-pune.html
१८. वैश्य सोनार संघ, यवतमाळ
http://www.mvss.co.in/p/vaishya-sonar.html
१९. वैश्य सोनार समाजिक व शैक्षणिक मंडळ, नाशिक
http://www.mvss.co.in/p/mvs-nashik.html
२०. समस्त वैश्य सुवर्णकार समाज, नंदुरबार
http://www.mvss.co.in/p/blog-page_2.html
समस्त शाखीय सोनार समाज संस्थेस समर्पित
२१. सोनार जोडो अभियान
http://www.mvss.co.in/p/blog-page_25.html
कृपया आपणही संकेत्स्थालास भेट द्यावी व आपले या उपक्रमाबद्दलचे मत नोंदवावे खाली comment मध्ये मत नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
http://www.mvss.co.in/
आमच्या ह्या उपक्रमास श्री.रमेश सावरकर, श्री.विनोद बिंड, श्री.अविनाश बिंड, श्री.अशोक सोनगिरकर, श्री.रमेश बहुगुणे, श्री.दिलीप शेटे, श्री.कमलकांत वितोंडे, श्री.रवींद्र बिंड, श्री.अनिल वलोकार, श्री.संजीव दहीवतकर, यांनी फोनद्वारे अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या आहे तसेच अन्य मान्यवरांनी पाठींबा दर्शविला ज्यामुळे मुख्य संकेतस्थळ website साठी आमचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
आपणा सर्वांचे जाहीर आभार व धन्यवाद
25 July 2016
11:28
Vaishya Sonar
No comments
वैश्य हा शब्द विश् पासून झालेला असून त्याचा अर्थ मनुष्य, लोक, प्रजा असा होतो; स्त्रीलिंगी अर्थ द्रव्य असाहि होतो. जुन्या संस्कृतांत विश् याचा अर्थ अन्न देणें असा होतो. वेदांत विष्पति म्हणजे खेड्याचा मुख्य असा शब्द येतो (क्र. १. ३१, ११.) आर्यांच्या चातुर्वर्ण्यात या जातीचें स्थान तिसरें असून तिचा समावेश द्विजांत होतो. या जातीचा धंदा कृशि-गोरक्षण-वाणिज्य हा प्राचीन काळापासून चालत आला आहे. आर्य लोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वी त्यांच्यांत हा वर्ग होता, असें दिसतें. शूद्राच्या वरच्या वर्गातील परंतु ब्राह्मण. व क्षत्रिय वर्गांतील लोकांहून भिन्न लोकांनां हा शब्द लावूं लागले. हल्लीं वैश्य हा शब्द वर्ण या अर्थानें प्रचारांत फारसा नाहीं, जातिरूपानें आहे. हिंदुस्थानांत वैश्य लोकांची संख्या पुष्कळ आहे परंतु ते लोक हल्लीं आपल्याला निरनिराळ्या जातिनामांनीं संबोधूं लागल्यानें हल्लीं एकूण वैश्य लोकांची संख्या जी सेन्सस रिपोर्टांत दिसून येते ती कमी आहे. ज्ञानकोशांत निरनिराळ्या वैश्य जातींची माहिती त्या त्या नांवाखालीं दिली आहे. त्याखेरीज ज्या जातींनीं आपला समावेश वैश्यजातींत करावा असें कळवून आम्हांला जी माहिती पुरविली आहे, ती येथें देत आहों.
वैश्य या नांवानें खानेसुमारींत समाविष्ट होणारी एकंदर लोकसंख्या (१९११ सालची) ४००६७ आहे, त्यांत म्हैसूर (२६४९७) व मद्रासप्रांतांत ती जास्त आहे. म्हैसूर राज्यांतील वैश्य संख्येपैकीं अर्धी अधिक संख्या कोलार व तुमकूर या जिल्ह्यांतच आढळते. हे लोक व्यापारी आहेत. कोचीनकडील वैश्य म्हणविणारे तेलगू भाषा बोलतात. पूर्वबंगाल्यांतून आसामांत ही जात गेली असून कामरूपकडील लोक शेती करतात व जानवें घालींत नाहींत (आसाम सेन्सस रिपोर्ट १९११). बृहत्संहितेंत यांनां पश्चिमविभागांतील रहिवाशी म्हटलें आहे (१४. २१.)
वैश्यसोनार:- रा. वा. ग. शिंगणापूरकर हें चांदूर बाझार येथून कळवितात कीं, ''वर्हाडांत व खानदेशांत वैश्य सोनार म्हणून प्रसिध्द असलेली जात सोनार नसून वैश्य आहे, परंतु त्यांचा धंदा सोनारीचा आहे. खानदेशांत व वर्हाडांत या जातीच्या पंचायती आहेत. फक्त बर्हाणपुरासच या जातीचा धर्माधिकारी आहे; इतरत्र नाहीं. जातीचीं देवळें घरें वगैरे स्थावरजंगम मालमत्ता मुळींच नाहीं. जातीचा कर नाहीं. आमचे जातीचे सदृष्य कोणतीच जात सांगणे कठिण आहे. तथापि दैवज्ञ जातीसारखी ही थोडी भिन्न जात आहे. ब्राह्मणाखेरीज कोणत्याहि जातीशी अन्नोदकव्यवहार नाहीं. सर्व संस्कार माध्यंदिन यजुर्वेदी भिक्षुक करतात. धार्मिक बाबींचा निकाल ब्राह्मणांकडून होतो. हे निकाल हायकोर्टाप्रमाणें मान्य झाले आहेत. जातीचें चातुर्वर्ण्यव्यवस्थेंत तिसरें स्थान आहे. मुळची ही जात महाराष्ट्रांतून तीनचारशे वर्षांत मध्यप्रांतांत आली. जातीची बंधनें इंग्रजी संस्कृतीमुळें बरींच ढिलीं झालीं. पुनर्विवाहाची चाल नाहीं. विधवांची व निराश्रित मुलांची व्यवस्था नाहीं राखीपासून झालेल्या मुलाची निराळी जात बनली आहे. तिला विदुर किंवा कृष्णपक्षी म्हणतात. महाराष्ट्रीय वैश्यवाणी किंवा लाडसोनार यांच्याशी संबंध नाहीं अथवा सोनार जातीची ही पोटजात नाहीं. लग्नांत मामाचेंहि गोत्र पाहतात. आमच्यांत अगस्ति, काश्यप, कौशिक, सांख्यायन वगैरे ११ गोत्रें आहेत.''
नार्वेकर वैश्य:- नार्वेकर वैश्यजातीबद्दल रा. वि. य गावडे जनरल सेक्रेटरी ना. वै. समाज, बेळगांव हे लिहितात कीं, ''आमचें मूळ ठिकाण गोंवेप्रांतांतील नार्वे गांव होय. पोर्तुगीजांच्या छळानें आम्ही घाटावर आलों. सांप्रत मुख्य वस्ती बेळगांव येथें असून, तेथें आमची मुख्य पंचायत आहे व एक समादेवीचें (जातीचें) देऊळ आहे. तिच्यासाठीं फंड प्रत्येकजणाकडून गोळा करतात. हुंड्यावर शेकडा २ रू. गोळा करण्याची चाल आहे. तसाच शिक्षणफंडहि सुरू आहे. केशवपनाची चाल अल्प प्रमाणांत आहे. या जातीशी सदृष्य अशा बादेकर (यांच्यांत पानवरे, संगमेश्वरी व पाटणे हे पोटभेद आहेत,) बावकुळे व वैश्य वाणी या जाती होत. द्रविड व गौडब्राह्मणांचेंच फक्त अन्न चालतें. विवाहादि संस्कार द्रविडब्राह्मण चालवितात. धार्मिक वाद संकेश्वरमठाकडून निवडतात. मंगेशी, नागेशी, म्हाळसादेवी, शांतादुर्गा वगैरे कुलदेव (गोंव्याकडील) आहेत. पुनर्विवाह रूढ नाहीं. नार्वेकर वैश्यसमाजाच्या १९१५-१६ सालच्या रिपोर्टावरून शिक्षणफंड १५३० रू. पर्यंत (त्यासालीं) जमला होता.''
कोमटी वैश्य:- कोमटी जातीविषयीं माहिती त्या नांवाखाली ज्ञा. को. ११ व्या विभागांत दिली आहेच. त्यासंबंधीं खुलासा करतांना गुलबर्ग्याचे रा. रामचंद्र लक्ष्मण जाजी हे लिहितात कीं, ''आमची कोमटी जात मूळची आंध्र वैश्य आहे. थर्स्टनच्या म्हणण्याप्रमाणें मद्दीग व ब्राह्मण यांच्यापासून झालेली नाहीं. आंध्रवैश्य हे आंध्रब्राह्मणांच्या हातचें खातात. आमच्या लग्नांत एक नाव करून ती विहिरींत सोडण्याची रीत आहे, यावरून पूर्वी आम्ही नावेंत बसून परदेशी व्यापारास जात होतों असें दर्शविलें जातें. पेनगोंडापट्टण (मद्रास इलाखा) येथें आमचे वैश्यगुरू भास्कराचार्य यांचें एक पीठ (शंकराचार्यांच्या पीठासारखें) आहे. आमच्यांत गोत्रप्रवर आहेत. आमचा समाज शिक्षणांत मागें आहे व धर्मभोळा आहे. गुलबर्ग्यापासून जवळ असलेल्या हिरापूर गांवी विहिरींवर १६ व्या शतकांतील तीन शिलालेख असून त्यांत आलेली 'वैश्य भिकाजी सोमाजी मोखेड, काश्यपगोत्रीय गौतम व मुग्दलगोत्री बंगोजी भानो' हीं तीन नांवें आमच्या वैश्य बांधवांच्या आहेत.''
11:27
Vaishya Sonar
No comments
विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
सोनार— सोनार हें नांव धंदेवाचक असल्यामुळें या नांवाखालीं विविध वर्णांचे व धर्मांचे लोक येतात; उदा. यांत दैवज्ञांसारखे ब्राह्मण व लाडसोनारांसारखे क्षत्रिय येतात. कांहीं मुसुलमान, जैन व शीखहि आपल्याला सोनार जातीचे म्हणवितात. एकंदर हिंदुस्थानांत १२॥ लाखांवर सोनार जातीचे लोक आहेत; पैकीं सुमारें १२ लक्ष हिंदु आहेत. ४०००० मुसलमान आहेत, व बाकीचें शीख (२८०००) व जैन (६०) आहेत. सर्वांत जास्त संख्या संयुक्तप्रांतांत सांपडते (२॥ लाख) व त्या खालोखाल बिहार-ओरिसांत (२ लाख) नंतर मुंबई इलाख्यांत (१३/४ लाख), व यापेक्षां कमी पंजाबांत आहेत. मुंबई इलाख्यांत दैवज्ञ, पंचाल, विश्वब्राह्मण, सोनार यांसारख्या नांवाखालीं सोनारांची संख्या फुटली आहे. खुद्द सोनार म्हणून सांगणारांची संख्या फुटली आहे. खुद्द सोनार म्हणून सांगणारांची संख्या सुमारें ९० हजार आहे. गुजराथेंत सोनारांनां सोनी म्हणतात. त्यांची तेथें संख्या सुमारें २० हजार आहे. मुंबई प्रांतांत सोनारांची व्याप्ति दक्षिण, कोंकण व कर्नाटक या सर्व प्रांतभर आहे. कानड्यांत त्यांनां अक्साळी म्हणतात. दुसर्या (सुतार, लोहार वगैरे) कारागिरांप्रमाणें हेहि आपली उत्पत्ति विश्वकर्म्यापासून सांगतात. हे स्वतःला पंचाळ म्हणवितात. यांच्यापैकीं कांहीं सोनार आपणांस ब्राह्मण म्हणवितात. सोनार समाजांत उच्च दर्जाचें म्हणजे दक्षिणेतले कानडे सोनार व विश्वकर्मा मुखोद्भूत पंचाल समजतात. परंतु देवांग व कोंकणी सोनार हेहि आपणाला ब्राह्मणासारख्या श्रेष्ठ दर्जाचे समजत असून आपणांस दैवज्ञ सोनार व पांचाल सोनार म्हणवून घेतात. वैश्य सोनारांचा एक चौथा वर्ग उत्पन्न झाला असून वरील जातींत त्याचा समावेश होतो. कांहीं ठिकाणीं अहीर सोनार अशीच आपल्या जातीची श्रेष्ठता प्रस्थापित करतात. पण काहीं ठिकाणचे अहीर सोनार जातीसंबंधीं महत्त्वाकांक्षां दूर ठेवून गोत्र जुमानीत नाहींत किंवा जानवेंहि घालीत नाहींत. लाड सोनार (क्षत्रिय) खालच्या पायरीचे गणण्यांत येतात. अहीर व लाड सोनारांच्या लग्नप्रसंगीं देवक पंचपल्लवीचें असतें ही गोष्ट त्यांच्या ब्राह्मण्याच्या आड येईल. शीलवंत व इतर सोनार हे यांच्याहूनहि खालच्या दर्जाचे आहेत [मुं. से. रि. १९११]
या माहितीवरून असें दिसून येईल कीं ज्याला सोनारकीचा धंदा करण्यापुरतें चातुर्य असतें तो आपला सोनारकीचा धंदा सुरू करतो; मग त्याची जात कोणतीहि असो. या योगानें मूळच्या अस्सल जातींत फार कमीपणा यावयाला लागला. तथापि अस्सल सोनार आचारविचारानें फार शुद्ध रहात असून जवळ जवळ बाह्यदृष्ट्या ब्राह्मणांसारखे दिसतात. यामुळें ब्राह्मणांची व त्यांची स्पर्धा सुरू झाली व पेशव्यांच्या अमदानींत सोनारांनी जानवें घालूं नये व थाटमाटानें लग्नेंहि करूं नयेंत म्हणून निर्बंध घातला होता. त्यावेळेस सोनार वरघोडा पाहणें वाईट समजलें जात असे. सोनारांनीं लग्नांत नवर्यामुलावर अबदागीर धरूं नये अगर पालखींत बसवून त्याची मिरवणूक काढूं नये अशा प्रकारचेंहि निर्बंध होतेसें दिसतें. कानडा जिल्ह्यांत सोनार शब्दाचा तिरस्कार इतका वाढला होता कीं, भोळे आस्तिक लोक रात्री 'सोनार' हीं अक्षरेंहि उच्चारीत नसत, व आपल्या पूजाअर्चेच्या वेळीं सोनारांच्या हत्याराचा 'ट ट' शब्द शक्य तितक्या रीतीनें टाळण्याची सावधगिरी घेत. अद्यापपर्यंत कानड्यांत कोणत्याहि जातीचा हलका देखील मनुष्य सोनाराच्या घरी पाणी पीत नाहीं अगर रात्रीची तेथें विश्रांति घेत नाहीं. सोनारावर एवढी इतराजी असल्याचें कारण बहुधा दुसरें कांहीं एक नसून सोन्यासारख्या मौल्यवान धातूची ते चोरी करतात हें होय. सोनारांचा पिढीजाद धंदा म्हणजे सोन्यारूप्याचें दागिने करणें व जडियेजवाहीर काम करणें हें होय. आतां कांहीं शेतकी तर कांहीं सरकारी नोकरीहि करतात. पूर्वी नाण्यांची पारख करण्याकरितां सोनाराची आवश्यकता असे त्या सोनारांनां पोतदार ही संज्ञा असून बलुतेदारांत त्यांचा समावेश केला जाई. सोनारांत पुढील १३ वर्ग आहेत:— (१) अहीर किंवा खानदेशी, (२) अझर, (३) देवांग अथवा दैवज्ञ अथवा पंचाल सोनार; (४) देशी अथवा मराठे सोनार; (५) कडू, दासीपुत्र अथवा विदुर; (६) कन्नड; (७) कोंकणी अथवा दैवज्ञ;(८) लाड; (९) माळवी; (१०) परदेशी; (११) साड; (१२) शीलवंत; (१३) वैश्य अथवा जैन.
या वर्गांत आपसांत रोटी-बेटीव्यवहार होत नाहींत. रत्नागिरीच्या कोंकणी सोनारांत टांकसाळे व अंगसाळे हे दोन भेद असून अंगसाळ्यांहून टांकसाळे श्रेष्ठ समजले जातात. मराठी राज्यांत टांकसाळ्यांकडे नाणें पाडण्याचें काम असे व अंगसाळ्यांकडे नाण्याची पारख असे.
सोनारांपैकीं जे आपणांस ब्राह्मण म्हणवीत त्यांनीं ब्राह्मणांच्या गोत्रपद्धतीचें अनुकरण केलें. इतर सोनारांच्या जाती त्यांच्या आडनांवांवरून प्रचारांत आल्या. देशी, अहीर, माळवी, लाड, व कडू सोनारांत देवक पंजपल्लवी असून शिवाय सांडस व फुंकणी हेहि जिन्नस असतात. देशी, माळवी, अहीर, लाड व कडू जातींत पुनर्विवाह मान्य आहे. इतर सोनार पुनर्विवाह करीत नाहींत एवढेंच नाहींतर विधवा केशवपन करतात. ब्राह्मणसोनार खेरीजकरून इतर सोनारांत घटस्फोट होतो. लग्न होण्याच्यापूर्वी मुलाची मुंज करून जानवें घालण्याचा परिपाठ आहे व मुलीचें लग्न ती वयांत येण्यापूर्वी उरकून घेतात. दैवज्ञ, कन्नड व वैश्य खेरीज करून इतर सोनार मांस खातात व दारू पितात. कन्नड सोनार दैवज्ञ सोनारांच्या घरीं अन्न घेत नाहींत, फक्त ब्राह्मणांच्या हातचें अन्न खातात. सोनारांचें अन्न मराठे, माळी, कुंभार, न्हावी व धनगर लोक खात नाहींत. कानडा जिल्ह्यांतलें सोनार कोणाच्या हातचे खात नाहींत, तर कोणतीहि हलकी जात सोनाराच्या हातच्या अन्नाला स्पर्श करीत नाहीं. कांहीं ठिकाणीं-विशेषेंकरून मुंबईत-सोनारांचे उपाध्याय सोनार असतात. यांच्यांत पंचायती आहेत. दैवज्ञ, पंचाल, विश्वब्राह्मण हे लेख पहा. [मुंबई सेन्सस रिपोर्ट, ८ (१९११); रसेल – हिरालाल; मुं. गॅ. १२, इत्यादि.]
Ref from: Maharashtrian Dhnyankosh (Ketkar) Part 21, Page no. 126
Subscribe to:
Posts (Atom)