चीत्रावलोकन


महाराष्ट्र वैश्य संघ, नागपूर. महावृक्षाची महागाथा


संपूर्ण वैश्य सोनारांची जुनी व विश्वसनीय संस्था म्हणजे महाराष्ट्र वैश्य संघ, नागपूर. समाजातील निराधारांवर झालेल्या अन्यायाविरोधात प्रेरित होऊन समाजातील काही महत्वाकांक्षी तरुणांनी जेष्ठांचे मार्गदर्शनात दि. १६ जून १९४६ रोजी नागपुर येथे १) समाजसंगठन २) शिक्षणप्रसार ३) सामाजिक सुधारणा ४) व होतकरू व विद्यार्थ्यांना मदत हि ४ उद्दिष्टे राखत संस्थेचे बीजारोपण केले. संस्थापक अध्यक्ष कै. श्री. विष्णुपंत सपकाळ व सचिव कै. श्री. गोविंदराव भूताड होते.





संग्रहित छायाचित्र स्थळ इतवारी हायस्कूल २७ /०५/१९५६









संग्रहित छायाचित्र स्थळ जुने हिस्लोप कॉलेज १९६६

पुढे बीजअंकुरितझाले व सन १९५४ मधे संस्थेची सहा. धर्मादायआयुक्तांकडे नोंदणी होऊन A-351(N) नोंदणी क्र. प्राप्त झाला. यानंतर संस्थेने जोमाने वाटचाल सुरु केली. दरवर्षी होणारे विविध समाजोपयोगी कार्यक्रम जसे वार्षिकोत्सव, शारदोत्सव, कोजागिरीनिमित्ते समाजातील जेष्ठांचा सत्कार, गरिबांना वैद्यकीय मदत व वैश्य विद्यावर्धक मंडळाच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थीसत्कार व त्यांना शिष्यवृत्तीद्वारे मदत करण्यात येऊ लागली. विशेषप्रसंगी महोत्सव रूपाने सामुहिक उपनयन संस्कार सोहळे, वर वधू परिचय मेळावेही आयोजित केले गेले. समाजातील दानवीरांनी अर्थरूपात खतपाणी देऊन या संस्थावृक्षास वाढीस नेले तर निस्वार्थ भावनेच्या कार्यकर्त्यांनी श्रम व वेळ देऊन याची निगा राखली.

संस्थेच्या ७ दशकांचे कार्यकाळात अनेक धुरंधर व मुत्सद्दी नेतृत्व लाभले, येथे फोटोसह निवडक यादी आहे ज्यांनी अध्यक्षपद भूषविले.


विष्णुपंत सपकाळ


गोविंदराव ज. भूताड

शामराव. वि. भुसारी

पांडुरंगपंत श. वड्याळकर

नारायणराव वि. पंत

डॉ. मधुकर भ. दाभाडे

डॉ. दत्तात्रय. ची. वझरकर
समाजोपयोगी कार्यासह जनजागृती कार्यही संस्थेने सतत व वेळोवेळी केले आहे जसे सतीप्रथानाश व विधवाविवाहास मान्यता असे तत्कालीन धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही केली. अंधश्रद्धा निर्मुलन व तत्सम्बंधी चालीरीती संपविण्याचे पुरोगामी निर्णय घेतले गेले.


अश्याप्रकारे उत्तरोत्तर बहरत जाणा-या ह्या वृक्षाने भारतीय राजकारणापासून दूर राहून प्रगती साधण्याचे काम केले परंतु बहुतांश सुवर्णकार कारागिर व सराफांसाठी जाचक अशा गोल्ड कंट्रोल एक्ट MISA ला विरोध व नोकरदार, गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय बांधवांचे हिताचा ओ.बी.सी. करिता गठीत राष्ट्रीय मंडळ आयोग १९७१ मध्ये आपल्या समाजास प्रतिनिधित्व मिळावे म्हणून प्रयत्न व त्याचा पाठपुरावा केला. दरम्यान संस्थेकरिता कायमस्वरूपी कार्यालय व सामाजिक उपक्रमाकरिता स्थायी जागा म्हणून दानवीरांचे व समाजबांधवांचे सहकार्याने रेशीमबाग नागपूर येथे एक भूखंड खरेदी करून त्यावर बांधकाम सुरु केले.

इथवर नागपूरच नन्हे तर राज्यभर संस्थेची व्याप्ति वाढत असताना ई. सन १९७५ ला संस्थेने राष्ट्रीयस्तरावर महाधीवेशन घेऊन विभागवार प्रतिनिधी नेमले व संपूर्ण भारतभर पसरलेल्या समाज बांधवाना एकत्र आणण्याकरिता त्यांची मोजणी व यादी प्रसिद्ध करण्याचा संकल्प सोडला. या अधिवेशनास अध्यक्ष लाभलेले श्री. भास्करराव वलोकर यांनी तशी वैश्य बांधवांची नामसूची १९७८ साली प्रसिद्ध केली, पश्चात १९८७ ला डॉ. मधुकर भ. दाभाडे यांचे अध्यक्षतेत अधिक संशोधित नामनिर्देशिका प्रसिद्ध करण्यात आली. परिणामी संस्था एका महावृक्षाचे स्वरुपात पुढे ओळखली जाऊ लागली.


नामसूची १९७८



नामनिर्देशिका १९८७


निरंतर निर्विघ्नतेत निरनिराळे उन्हाळे पावसाळे सोसत हा संस्थावृक्ष डौलाने उभा होता, समाजबांधवाना छाया, उब व फळ देतांनाच दुष्काळाचाही सामना करत होताच, असाच दुष्काळ संपवून या महावृक्षाने परत उभारी घेत समाजबांधवांच्या एकीने संकटांवर मात करून डॉ. दत्तात्रय ची. वझरकर यांचे अध्यक्षतेखाली समाजभवनाचे नुतनीकरण व बांधकाम पूर्ण करून संस्थेस नवी उभारी दिली. नव्या उत्साहाने, नव्या जिद्दीने सर्व कार्यकर्ते मिळून सहल, वर वधू परिचय मेळावा, व भव्य उद्घाटन सोहळा असे सलग कार्यक्रम घेतलेच खेरीज अ. भा. वैश्य सोनार समन्वय समिती व सर्वशाखी बांधवाना एका व्यासपीठावर आणण्याकरिता सोनारजोडो अभियानातही हिरीरीने पुढाकार घेतला.


केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरींचेहस्ते समाजभवनाचे उद्घाटन


वर वधू सोहळा २०१७

आजमितीस संस्थादायित्व ज्या कार्यकारिणीचे हाती आहे ते विद्यमान संचालक मंडळ २०१७ ला सार्वमताने निवडून आले, यांनी संस्थारूपी ह्या महावृक्षाची मुळं व पारंब्या सर्वदूर फैलावत राष्ट्रस्तरावर संस्थेचा लौकिक नेला.

अध्यक्ष
श्री. अनिल भा. वलोकार

सचिव
श्री. सुनील श्री. साउरकर

कोषाध्यक्ष
श्री. दत्तात्रय गो. वलोकार

उपाध्यक्ष
श्री. पुरुषोत्तम पां. पुरकर



श्री. रमेश विठ्ठलराव सावरकर
श्री. प्रदीप (राजू) प्रभाकरराव वितोंडे
सौ. जया नरेंद्र गोळतकर.
श्री. संजय रामभाऊ दाभाडे.
श्री. उदय विनायकराव वड्याळकर
श्री. अभय मधुकरराव वड्याळकर
श्री. शिरीष दिनकरराव वण्याळकर
श्री. अजय रमेशराव बोरकर.
श्री. विलास शंकरराव सपकाळ
श्री. अजय यादवराव वाऊ
श्री. मंगेश वासुदेवराव वड्याळकर
सौ. श्रद्धा प्रदीप (ज्योती संजय ) सपकाळ.
श्री. सुधीर मण्याजी चावरे .


विद्यमान अध्यक्ष श्री. अनिल भा. वलोकार यांचे दूरदृष्टी व धडाडीची प्रचीती लवकरच आली. त्यांनी उपक्रम व आयोजनांत मनोरंजक व नाविन्यपूर्ण वातावरणाचा अंतर्भाव दिला. संपूर्ण कार्यकारीणी एकदिलाने त्यांचेसह जबाबदारीने कार्यरत आहे. ह्यातच लक्षवेधी ठरला तो नुकताच यशस्वी झालेला सामुहिक उपनयन संस्कार व वधूवर परिचयमेळा २०१९. यात देशभरातून तब्बल ३ हजार बांधव नागपूरच्या तिव्र उन्हाळ्यातही जातीने व आस्थेने हजर होते. याआधीही इतर बरेच उपक्रम विद्यमान कारिणीकाळात राबवीले गेले, अल्पोल्लेख खालीलप्रमाणे:


राष्ट्रस्तर सामुहिक उपनयन संस्कार व वरवधू परिचय मेळा १९
नागपुरातील रेशीमबाग मैदानात २ भव्य डोम्स उभारून, वैश्य सोनारांतला विक्रमी ३हजार उपस्थितांसहचा हा अखिल भारतीय स्तरावरील कार्यंक्रम १० व ११ जून रोजी झाला. याची दखल सर्व प्रसिद्धी माध्यमांनी घेतली. आदले दिनी वधूवर परिचय मेळा व चर्चासत्र होते, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोशल मिडिया माध्यमातून झाले, बाहेरगावांतील अनुपस्थित बांधवांनीही घरबसल्या कार्यक्रम आस्वाद घेतला, दुसरे दिवशी विक्रमी ८४ बटुंची सामुहिक मौंज अंजनेय मठाधिश पपू. जितेंद्रनाथ महाराजांचे उपस्थितीत झाली.


कौटुंबिक सहल २०१९ रावणवाडी
१९ जानेवारी- ४० आसनी ४ बसेसने २४० समाजबांधाव एकत्रीतरित्या सहलीस गेले, ज्यात मनोरंजक खेळ, प्रश्नोत्तरी, गायन, वादन व सामाजिक परिचर्चा असेही स्वरूप होते, भंडारा जिल्ह्यातील रावणवाडीचा निसर्गरम्य परिसरात ऐक्याचे असे संवर्धन झाले.



दिवाळी मिलन २०१८
२५/११/१८- समाज भवन, रेशिमबाग येथे हा सोहळा हर्षात व जल्लोषात संपन्न झाला, मुलामुलींसाठी फँन्सी ड्रेस, रँम्प वॉक, गायन, नृत्य स्पर्धा झाली, कार्यक्रमास ३२२ समाजबांधवांची उपस्थिती लाभली. संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांहस्ते लक्ष्मीपुजन झाले व लगेच आनंदमेळा व उद्योजिका मेळावा घेण्यात आला. दोन्ही मेळ्यांत कुठलेही शुल्क आकारले गेले नाही, हा नवा पायंडा सर्वांस सुखावून गेला.




विद्यार्थी गुणगौरव २०१८
१९/८/१८- समाजभवनात हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कविकालीदास संस्कृतविश्वविद्यापीठ रामटेकचे कुलगुरू डॉ. श्री पंकज चांदे, प्रमुख पाहुण्या आकाशवाणी-निवेदिका व पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापिका डॉ.सौ मंजुषा सावरकर, केवलरामाणी हायस्कूलच्या प्राध्यापिका डॉ, सौ अनुराधा अ खेडकर अशा मान्यवरांची उपस्थिती होती. सायंसत्रात २५० समाजबांधवांनी उपस्थिती दर्शिविली. संस्थेचे चालू वर्षातले सामाजीक कार्यक्रम चलचित्र माध्यमातून पडद्यावर दाखविले गेले.


वर्धापनदिन सोहळा २०१८
६ जून १८- संस्थेचा ६३ व्या स्थापनादिन पर्वावर सर्व आजी, माजी, तसेच हयात व दिवंगत अश्या संस्थासेवींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ५३७ समाजबाधवांची उपस्थिती लाभली. प्रचंड उपस्थितीने आयोजकांचाही उत्साह व विश्वास दुनावला. LED स्क्रिनवर संघस्थापना १९४६ ते विद्यमानकाळापर्यंतचा इतिहास सादरीकरण झाले. उपस्थितीसंख्येने भवनातील दोन्ही माळे सुसज्जित राखले होते. प्रमुख पाहुण्यांत मा खासदार श्री कृपालजी तुमाने, व आमदार श्री गिरीशजी व्यास होते तर मंचावर सर्वश्री अशोकराव भुताड, डाँ मधुकरराव दाभाडे, सुनिल भटुरकर, दिलीपराव दाभाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामचंद्र अ गोटीवाले, जबलपुर, असे मान्यवर होते.


कौटुंबिक सहल २०१८ घोडाझरी
प्रथमच शहरापासून दूर चंद्रपूर जवळील घोडाझरी या निसर्गरम्य स्थळी सहलीत ४ मोठ्या बसेस व २६० समाजी सहभागी झाले. तलावपरिसर भ्रमण, बोटिंग व मनोरंजक खेळ, प्रश्नोत्तरी, गायन, वादन व सामाजिक परिचर्चा असे स्वरूप देण्यात आले होते.



अश्या विवीधांगी कार्यक्रमांमुळे समाजऐक्य गाठत, समाजींना एकसंघ राखत याच माध्यमातून प्रबोधन व योग्य मार्गदर्शन ई. सहज शक्य होते. महाराष्ट्र वैश्य संघास सर्वस्तरातून आज सहकार्य मिळतेय. त्यासाठीचा बांधवांचा विश्वास या संचालक मंडळाने मिळविलाय. समाजातील वरिष्ठ, ज्येष्ठ स्वत:हून बहुमोल मार्गदर्शन करताहेत. यासह तत्पर अशी ५०+ तरुणांची चमू सर्व कार्यात सदैव मदतीस उभी आहे, मग महिलाच मागे कशा असतील? तर प्रत्येक वेळी महिला मंडळही हिरीरीने सर्वकार्यात सहभाग देतात व सर्वस्तरसहभागध्येय सार्थक करून दाखवतात.

याच विश्वासाने व एकीच्या बळाने अध्यक्ष व कार्यकारिणीने पुढील वाटचालीत समाजास कायमस्वरूपी उत्पनाची साधने निर्माण करणे, त्याद्वारे समाजातील बेरोजगारांना रोजगार, व्यावसायिकांना आर्थिक पाठ्बळाकरिता क्रेडीट सोसायटीची स्थापना, व समाजमालकिची शैक्षणिक आस्थापना निर्मिती ई. असे महत्वाचे ध्येय राखलेयत व लवकरच या मार्गांवर वाटचालीचा विश्वास सर्वांनाच आहे, तो सार्थकी लागवा हि सदिच्छा.

आर्किटेक्ट प्रतिक पु. पुरकर, नागपूर




    




सामुहिक उपनयन संस्कार व वधु-वर परिचय सोहळा २०१९ आयोजक म. वै. संघ, नागपूर.
नागपूरात दिर्घ कालावधीनंतर असे भव्य आयोजन होते आहे यासह वधु-वर मेळाव्याचेही आदले दिवशी नियोजन केले आहे ज्यायोगे लग्नविषयक समस्येबाबत उपस्थितांना मदत घेता यावी. करीता समाज बांधवाना/सर्व वैश्य सोनार संघ अध्यक्ष/सचिव/कार्यकारीणीस विनंती कि, आपले परीने कार्यक्रमास सहकार्य द्यावे
दि,११ व १२ जुन २०१९ रोजी प्रस्तावीत  सामुहिक उपनयन संस्कार व वधु-वर परिचय सोहळा २०१९ यात भाग घेणा-या परिवारांस त्यांच्या परीस्थितीनुसार ऐच्छीक/यथाशक्ती शुल्क कायम राखण्यात आलेले आहे.
ज्या परिवाराची आर्थिक परिस्थिति शुल्क देण्याईतपत नाही, अशा गरजूंनाही बटुंची मौंज करता यावी म्हणूनच यथाशक्ति अशी ती राखण्यात आली. यात कोणत्याही प्रकारचे आर्थिक (नोदणी शुल्काचे) बंधन नाही.
बटुंच्या परीवाराने त्यांच्या परीस्थितीनुसार यथाशक्ती योगदान करावे, ज्यांची परीस्थिती नसेल अशांनी कसलाही संकोच न बाळगता सामाजिक म्हणून कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा.
याउलट जे कुटुंब परस्थितीने सक्षम आहे, परिस्थितीनुरूप सामुहिक दायित्वात/ कार्यक्रमात यथाशक्ती सहकार्य करु शकतात, अशा परिवाराने या कार्यक्रमात भाग घेता/ न घेताही त्यांचे सोईनुसार (यथाशक्ती) आर्थिक सहकार्य करावे. सर्व खर्च समाजातील देणगीदार/दानशुर व्यक्तींच्या सहकार्यानेच करण्यात येईल
आपल्या समाजात असे अनेक आर्थिकदृष्ट्या सक्षम दानविर/देणगीदार आहेतच, अशा सर्वांनाही संस्थेतर्फे नम्र विनंती कि, त्यांनी या सामाजिक उपक्रमात यथाशक्ती हातभार लावावा. ज्यामुळे समाजातील अल्पोत्पन्न समाजबांधवांचे कार्यही (मौंज) आपल्या अमुल्य सहकार्याने, यथायोग्य रितीने आयोजनाचा प्रयत्न संभव आहे. आपणा सर्वाचे सहकार्यावरच हा कार्यक्रम अवलंबून आहे, 
अद्याप जवळपास ३५ मुलांची नावे मौंजेकरीता आलीयत, तर सहभाग घेणा-या बटुंचा आकडा जवळपास ७०/७५ होण्याचा अंदाज आहे. तरी समस्त समाजबांधवांस विनंती कि, आपल्या गावातील/शहरातील समाजमुलांची नावे दि १५/५/२०१९ पुर्वी प्रतिनिधिंकडे वा संस्थेत नोंदवावी, वर-वधु मेळावा व बटुंच्या उपनयन संस्कार सोहळ्याचे फॉर्म कुरीयरद्वारे प्रतिनिधिंकडे आधीच पाठविलेले आहेत. 

(प्रवेश अर्ज खालिल लिंक वरूनही डाउनलोड करू शकता करिता छायाचित्रावर क्लिक करा)
 परिचय मेळावा   उपनयन सोहळा  नियम

सदरची नोंदणी करून आपल्या गावातील/शहरातील नेमलेल्या प्रतिनीधींकडे ते पाठवावेत, अथवा नागपूर कार्यालयास पोचते करावे. 
(प्रतिनिधि यादि तपासण्यास खालिल लिंक क्लिक करावी) 
https://m.facebook.com/events/315580995820934?view=permalink&id=319673038745063
प्रतिनिधिंनीही रितसर फॉर्म भरुन १५/५/१९ पर्यंत महाराष्ट्र वैश्य संघ, कार्यालयात पाठवावेत.
या कार्यक्रमास्तव सर्वसंस्था प्रतीनिधी समन्वयाने सहकार्य करीत आहेत /परिश्रम घेताहेत ,त्यामुळे आपलेही कर्तव्य आहे कि, समाजाचा पर्यायाने आपलाच कार्यक्रम असल्याने सर्व प्रतीनिधीना सहकार्य करावे, सर्व प्रकारची मदत करावी,
कार्यक्रमाची रुपरेषा आगामी कार्यकारिणी बैठकीनंतर संस्थेमार्फत कळविन्यात येईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
वेबसाइट जाहीरात
http://www.mvss.co.in/p/mvs-nagpur.html
फेसबूक इव्हेंट
https://m.facebook.com/events/315580995820934?view=permalink&id=322795208432846

समाजातील बालगोपाळांत रीतीरिवाजानुरूप धार्मिक संस्कारांची जपणूक, परंपरा, ओळख राखणे महत्वाचे पण आर्थिकदृष्ट्या परवडावे म्हणून महाराष्ट्र वैश्य संघ, नागपुर वतीने सामुहिक स्तरावर मौंज आयोजनात पुढाकार घेतला गेला आहे. सर्व बांधवाना किमान खर्चात चांगले आयोजन करण्यासंदर्भात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.



वार्षिक सर्वसाधारण सभा २०१६-१७ महाराष्ट्र वैश्य संघ, नागपूर

महाराष्ट्र वैश्य संघातर्फे समाजबांधवांची कौटूंबिक सहल

नागपूर व जवळपास च्या समाज बांधवांचे आपसांत जिव्हाळावाढीसाठी त्यांचे एकत्रीकरणाचे कार्यक्रमांवर महाराष्ट्र वैश्य संघ सदोदीत भर देत विवीध का्यक्रमांचे आयोजने करित असते, पैकी प्रत्येक वर्षास कौटूंबिक सहल हा उपक्रम राबवीला जातो. यावर्षीचे सहलीचे आयोजन रविवार दि २२/१/१७ रोजी, कुकडीपांजरा येथील वलोकार फार्म हाउस व पारडसिंगा माता मंदिर होते.सदरील माहिती संस्थेने वार्षिक आमसभेत आधीच पत्रकाद्वारे व बॅनरवर उपस्थितांस वितरीत केलेली होती. त्यास समाज बांधवांनीही भरपुर प्रतीसाद दिला तत्सम संपर्ककर्ते व उपस्थीतांस अनुसरून २ लग्जरी बसेस व काहि कौटूंबिक वाहने अशी व्यवस्था करून ईतवारी परिसरातून एक व पश्चिम नागपुरातून एक अशा बसेस सकाळी १०:३० ला काटोलनजीक कुकडीपांजरा या गावी श्री अनिल वलोकार यांचे फार्महाऊसवर पोचल्या. तेथून पायवाटेने फार्मवर गेल्यावर स्वागतादाखल प्रभातन्याहारी झाली यात विषेश म्हणजे वलोकर परीवार तर्फे सर्व नैसर्गीक खाद्य उपलब्ध केलेले होतेजसे संत्री/मोसंबी, पेवंदी/गावठी बोरं, ओले हरबऱ्याचे झाडे, पेरू,भाजका हुरडा, कुरमूरे फिंगर्स, कोवळ्या वाटाण्याच्या शेंगा, ऊस व त्याचा ताजा रस असा रानमेवा चनापोह्यांसह उपलब्ध होता,सर्वांनी मनमुराद आस्वाद घेत तत्पश्चातच्या विवीध खेळांच्या आयोजनात सहर्ष भाग घेतलायात जोडप्यांसाठी पाठफुगा रेस, एकहाती रिंग झेलने, चिठ्ठीप्रमाणे येईल त्या प्राण्याचे साभिनय आवाज काढणे असे करमणूक प्रकार होते तर वैयक्तीकरित्या गाणी सादरिकरण पुरूषांसाठी बालपणात रमण्यासाठी गोट्यांचा डाव वगैरे खेळ झाले.तद्नंतर शेतीचा फेरफटका व नेचर फाेटोसेशन झाले, पश्चात माध्यान्हभोजन आटोपले गेले,जेवणाची व्यवस्था वलोकर परीवार तर्फे होती ज्यायोगे महिला स्वयंपाक टिफीनच्या कटकटीत न रहाता आयोजनांत सहभागी होऊ शकल्या.द्वितीय सत्रात संस्थाध्यक्ष श्री दत्तात्रय वझरकरांनी अल्पद्बोधनाद्वारे सहल हेतू व गरज विषद केली, आयोजनात सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभारही व्यक्त केले, श्री विजय श्रीपतकर व श्री सुकुमार प्रभाकर घोडे या काटोलमधील सोनार नगरसेवकांचाही (विदर्भ माझा पक्षातर्फे) म वै संघा तर्फे सन्मान केला गेला, श्री घोडे यांनी आभारादाखल सोनारांच्या राजकीय क्षेत्रातल्या प्रभाववाढी व गरजेबद्दल सांगीतले.यानंतर श्री रमेश शेटे यांनी संत तुकडोजींच्या भजनरचना आपल्या ढोलक/टाळकरांच्या गजरात सादर केल्या व उपस्थीतांस खिळवून ठेवले.सायंकाळ सुमारास चहापानानंतर सर्व गावातील बंगल्यावर परतले, मकरसंक्रांतीनिमित्त वलोकार कुटूंबातील महिलांतर्फे हळदिकुंकू व वाणवाटप तर इतरांत ताजे भाजी प्रकार व संत्रापार्सल वितरण केले गेले तत्पश्चात सहलीचा दुसरा टप्पा सती अनसुया माऊली दर्शन पारडसिंगा येथे जाऊन आटोपला गेला व सुखरूप परती प्रवास होऊन सहलीची यशस्वी सांगता झाली .













म. वै. संघ नागपूर वार्षिक सर्वसाधारण सभा २०१७










महावैश्यसंघ भवनात कोजागरी मीलन

नागपूर- महारा्ष्ट्र वैश्य संघ वतीने रविवार दि. २३/१०/१६ रोजी सायं ६ ते रात्रौ ११ पर्यंत कोजागरी मीलनाचा कार्यक्रम रेशिमबाग येथील नवनिर्मीत समाजभवनात साजरा झाला. दरवर्षालाच या कार्यक्रमाचे आयोजन होते, समाजभवनात आयोजनाचे हे द्वितीय वर्ष, त्यामागे ऊद्देश हाच की बांधकाम प्रगती सर्व समाजींना न्याहाळता यावी.
कार्यक्रमाला पुर्व, पश्चिम, ऊत्तर, दक्षिण, मध्य, ग्रामिण व बाहेरगावातील सुमारे २८० ज्ञातीबांधवांची हजेरी होती. कार्यक्रमात सुगम संगिताचे आयोजन समाजातले उदयोन्मुख गायक आदित्य सावरकर व चमु यांतर्फे केले गेले,मराठी सुगम संगिताने उपस्थितांना खिळवून धरले होते, त्यातच यवतमाळ संघाचे माजी अध्यक्ष श्री विनोद बिंड यांनीही ' देवा तुझा मी सोनार" हा संतश्री नरहरी विरचीत अभंग गायला व सर्व समाजींना त्यांच्या आराध्याचे स्मरण करवून दिले, या गायन-आनंदात रममान असतानाच दुग्धवाटप झाले व सर्व या दुहेरी रसांत मुग्ध झाले.

  

संघ अध्यक्ष श्री दत्तात्रय वझरकर व सचिव श्री विद्याधर भुताड यांनी अल्प संबोधनाद्वारे ऊपस्थितीबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले व भवन बांधकामात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्ञातीबांधवांचा गौरव केला ज्यात बांधकाम समितीतील जेष्ठ,अनुभवी श्री अनिल भा वलोकार,श्री विकास शेटे व श्री विजय शिळणकर यांचा सत्कार झाला,श्री वझरकर बंधूचाही सत्कार तर गायनचमुतील पाहुण्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला. भवन बांधकाम जानेवारीपर्यंत पुर्ण करण्याचा मानस असून करिता यथाशक्ती मदतीचे आवाहन याप्रसंगी केले गेले. सर्व ऊपस्थितांनी कार्यक्रमाचे आयोजनाबाबत कार्यकारीनी सदस्य/पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व समाजभवन बांधकामाबाबत समाधान नोंदवीले तर ऊपस्थित राहू न शकणाऱ्यांनी/बाहेगावातील संस्था,पदाधिकाऱ्यांनी दुरध्वनीहून/व्हॉट्सअँप द्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा कळविल्या. कार्यक्रमाची सांगता सहभोजाने झाली.
या सर्व आयोजनात कार्यकारीनी सदस्य, बांधकाम समिती व विभागीय समिती पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी मोलाचे याेगदान दिले.

महाराष्ट्र वैश्यसंघ समाज भवनात चैत्रगौरपुजेनिमीत्त कौटुंबिक मेळा संपन्न 

नागपूर- महाराष्ट्र वैश्यसंघ महिला समितीचा चैत्रगौरी पूजन व मेळा रविवार दि ८/५/१६ रोजी सायंकाळी रेशिमबाग येथील समाजभवनात संपन्न झाला. कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणिय होती.सर्वप्रथम सर्व महिलांच्या उपस्थितीत गौरीपूजन व आरती करण्यात आली व त्यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजनामत्क खेळ घेण्यात आले. यात एक मिनीट चटपट गेम्स, संगीत खुर्ची ई खेळांचे आयोजन होते सर्वच महिला उत्साहाने खेळात सहभागी झाल्या. शेवटी स्पर्धेत विजेत्या महिलांचे बक्षीस देवून अभिनंदन करण्यात आले. यात पोलो खेळात कविता जडे,विनीता भुताड यांनी बाजी मारली तर निडल एन्ड बॅन्गल खेळात कविता जडे, रोशनी सावरकर यांनी क्रमांक पटकावले, बलूनबेंगल्स खेळप्रकारात विनीता बोरकर, मानिक वड्याळकर यांनी तर संगीतखुर्ची स्पर्धेत सानिका वझरकर विजेत्या ठरल्या. सर्व खेळांत जवळपास १०० महिलांचा सहभाग होता तर संपुर्ण कार्यक्रमात महिलांची ऊपस्थिती २१५ व पुरूष मंडळी मिळून ३२० चे आसपास समाजींनी कार्यक्रमास हजेरी लावली या औचित्याने समाजातील लघुऊद्योजकांचे स्टॉल्सही येथे सेवेत होते त्यात दिपाली शिंगणापूकरर यांचा बुटिक वस्त्र,बेटावदकर यांचा पापड/मसाले, वलोकार यांचा रेडिमेड रंगावली डिझाइन्स असे साहित्यांची बऱ्याच समाजींना अल्पखर्चात खरेदि करता आली शेवटी सहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमासाठी वैश्य संघ पदाधिकारी व महिला समिती सदस्यांनी परिश्रम घेतलेकार्यक्रमासाठी वैश्य संघ पदाधिकारी व महिला समिती सदस्यांनी परिश्रम घेतलेकार्यक्रमासाठी वैश्य संघ पदाधिकारी व महिला समिती सदस्यांनी परिश्रम घेतले





0 comments:

Post a Comment

Upcoming event News आयोजित कार्यक्रम वार्ता

  • a
  • b
  • c

past event News संपन्न कार्यक्रम वार्ता

  • c
  • b
  • a

Download

forum मुक्तपीठ

forum मुक्तपीठ
सामाजिक मुक्तपिठ Social networking आमचा Telegram group सोबत संलग्न व्हा

Community Store Regestration

Community Store Regestration
समाज भांडार सूची फॉर्म

Matrimony Regestration

Matrimony Regestration
वधु वर माहिती फॉर्म

Directory form

Directory form
नामसूची फॉर्म

websit चे बदललेले नवे स्वरूप आपणास कसे वाटले?

Categories

Total Pageviews संकेतस्थळ दर्शक संख्या

Advertisement जाहिरात

facebook

Maps

Calander

Contact Form संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Popular Posts